Type Here to Get Search Results !

साळाव -मुरुड रस्ता रुंदीकरणाने घेतला दुचाकी स्वाराचा बळी

कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर)साळाव -मुरुड रस्त्यावर रस्ते विकासात मोरीसाठी खणलेल्या खड्ड्यात मोटार सायकल कोसळून झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

 अलिबाग वनविभागात (पोयनाड -पेझारी) नोकरीस असलेले मुरुड तालुक्यातील सर्वे येथील सुरज सुहास सारंगे आपल्या मित्राला घेऊन शुक्रवार दि.६ मार्च रोजी चिकणी गावात गेले होते,रात्री साडे नऊच्या दरम्यान परत सर्वे गावाकडे येत असताना साळाव -मुरुड रस्त्यावर चिकणी -सर्वे दरम्यान शुक्रवार बाजार जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या प्रखर उजेडाने दिपवल्याने मोरीसाठी खणलेल्या खड्ड्यात मोटार सायकल कोसळून झालेल्या अपघातात सुरज सुहास सारंगे (वय -२७ अंदाजे) याचा मृत्यू झाला तर सचिन चंद्रकांत सुर्वे (वय -२६अंदाजे)गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करीत आहेत.

  सर्वे येथील सुरज सुहास सारंगे यांच्या पश्चात आई पत्नी, तीन महिन्यांची दोन जुळी मुले, चुलते, दोन चुलत भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर