Type Here to Get Search Results !

मुरुड-एकदरा गायमुख समुद्रकिना-यावर आगळीवेगळी फिशींग स्पर्धा

मुरुड-जंजिरा,ता.१(सुधीर नाझरे)नवीमुबई येथील न्यू अंगलर मुंबई संस्थेने मुरुड-एकदरा जवळील गायमुख समुद्रकिनारी १०० हुन अधिक स्पर्धकांची ६ वी  फिशिंग स्पर्धा आयोजित केली होती .यास्पर्धेत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत समुद्रावर ठरवून दिलेल्या जागेवर फिशिंग रोडने मासेमारी करायची होती ,ज्याला सर्वात मोठा व जास्त वजनाचा मासा मिळेल तो प्रथम येणार होता,त्याला ५० ,२५ व १५ हजारांची रोख पारितोषिके होती .संस्थेच्या अटी व नियम लागू असणार अशी माहिती प्रमुख अविनाश मुकादम यांनी दिली. ही स्पर्धा कल्पेश धुमाळ ,नदीम शेख ,प्रशांत रानकर, अक्षय दांडेकर ,गणेश कोळी ,अजय म्हात्रे ,हर्षद मळेकर ,संकेत पाटील ,गणेश पाटील यांच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात आली होती.

        या स्पर्धे विषयी आपले मनोगत व्यक्त करताना अविनाश मुकादम म्हणाले कि, मुरुड जंजिरा शहराचा समुद्रकिनारी अतिशय सुंदर आहे त्यात एकदरा गावाचा मागे असणारा गायमुख परिसर फिशिंग साठी शांत व समुद्राच्या लाटांसोबत येणार वारा अनुभवत मन एकग्रह करून फिशिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो ,अनेकांना फिशिंगची आवड असते परंतु चांगले लोकेशन व सर्व सुविधा उपलब्ध नसतात आणि नवीमुबई येथील न्यू अंगलर मुंबई संस्था हेच काम करते .ऍडव्हेंचर विभागात या स्पर्धेचा समाविष्ट होतो .हि मासेमारी करताना स्पर्धकाला सहनशील व एकग्रहता गरजेची असते तरच आनंद मिळतो. 

          अगोदर फिशिंग स्पर्धा मुंबईत झाल्या आहेत ,कोकण व रायगड पर्यटनक्षेत्र असल्याने आमच्या ग्रुपने ही स्पर्धा मुरुडला घेण्याचे ठरवले ,स्पर्धेच्या परवानगी साठी एकदरा सरपंच यांनी मोठी मदत केली ,गायमुख परिसरात पर्यटन विकासाचे नियोजन करण्यात आले आहे .पूर्ण किनारा सुसुज्य बंधारा व रास्ता करण्यात येणार आहे .पुढील काळात येथे महाराष्ट्राच्या फिशिंग स्पर्धा होतील अशी आशा असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर