Type Here to Get Search Results !

मुरुडच्या श्रीदत्त देवस्थान मंदीरात लघुरुद्र व दत्तयाग सोहळा : हजारो भाविकांनी घेतला लाभ


कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर) मुरुडच्या प्रसिद्ध  प्राचीन श्रीदत्त मंदिरात श्रीदत्तयाग व लघुरुद्र सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

   यावेळी मंदिरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र भक्तगण जप करत सोमवारी सकाळी ६ वाजता रामचंद्र आरेकर यांच्याकडून भगवान श्री गुरुदेव दत्त यांना पंचामृताने अभिषेक करण्यात आला. यंदा श्रीदत्तयाग व लघुरुद्र पूजाकरिता प्रत्येक समाजाकडून १जोडपे असे १६ जोडप्यांना या पूजेचा मान मिळाला.यावेळी वेदपठण, होमहवन आणि क्षेत्रपाल मंडळ पूजन ११ ब्राह्मणांद्वारे करण्यात आले.

     दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात झाल्यानंतर स्थानिक भजन मंडळाकडून भजन गायन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२:३० नंतर महाप्रसादाचे मानकरी रामचंद्र कृष्णा आरेकर व समस्त आरेकर परिवार यांच्याकडून येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सर्व भाविकांना श्रीक्षेत्र दत्तमंदिर येथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही श्रीदत्त देवस्थान पूजा समिती, उत्सव समिती व दत्तयाग व लघुरुद्र समिती सर्व समाज अध्यक्ष व पाखाडी अध्यक्ष यांच्यातर्फे करण्यात आली होती.श्रीदत्तयाग व लघुरुद्र सोहळ्याचा हजारो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीदत्तदेवस्थान ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भायदे व कार्यकारीणी सदस्य श्रीदत्त देवस्थान पुजा समिती, उत्सव समिती व दत्तयाग व लघुरुद्र समिती सर्व समाज अध्यक्ष व पाखाडी अध्यक्ष यांनी  विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर