कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील डि.एड.महाविद्यालयाच्या सन.१९८५ अध्यापकांनी मुरुडच्या डॉ.बेनकर यांच्या फार्म हाऊस येथे नुकताच सलग सातव्यांदा दोन दिवसीय गेट टुगेदर साजरा करुन आठवणींना उजाळा दिला !
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सर्व १९८५च्या ग्रुप मधील दिवंगताना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यांत येऊन ग्रुपमधील सेवा निवृत्त शिक्षिक रमेश म्हात्रे,प्रतिभा पाटील,विजया गुंजाळ यांना भेट वस्तुदेऊन सन्मानित करण्यात आले.त्यानंतर खोकरी येथील प्रसिद्ध असलेल्या घुमटाला,मुरूड मधील डोंगर माथ्यावर असलेले प्रसिद्ध श्रीदत्तमंदिर येथे भेट दिली.नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मुरूड जंजिरा नगर परिषदेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला. गुरुवर्यांनी केलेला माझा सत्कार हा माझ्या जिवनातील सर्वात मोठा क्षण असून त्याबद्दल विरेंद्र भगत यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख नेत्या प्रतिभा पाटील,अलका फोंडे,मिनाक्षी महाडिक, प्रियवंदा पाटील,विजया गुंजाळ,माधुरी झेमसे,सुजाता दांडेकर,सुमिता तेलंगे,सुलोचना जामकर,प्रतिभा का.पाटील,निर्मला शेरमकर,निलवंती पिंगळे तसेच राजेंद्र साखरकर, दत्ताराम म्हात्रे,प्रदिप म्हात्रे,प्रभाकर पाटील,सुनिल सुधाकर राऊत,विश्वजीत म्हात्रे ,रमेश म्हात्रे,राजेंद्र म्हात्रे,पांडुरंग आरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले तर सुनिल पाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या