Type Here to Get Search Results !

शालेय सहलींनी बहरला मुरुडचा समुद्र किनारा : विद्यार्थ्यांनी लुटला समुद्र सफरीचा आनंद !

 

कोर्लई,ता.11(राजीव नेवासेकर)मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सहलींचा हंगाम सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत आहेत. त्यामुळे मुरुडचे समुद्रकिनारे शालेय सहलीने बहरली आहेत. या विद्यार्थ्यांनी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा पाण्यात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला आहे. 

       दिवाळीच्या सुट्टीनंतर थंडीच्या हंगामामध्ये शालेय सहलींना सुरुवात होत असते.  शालेय विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती मिळावी याकरता सहलींचे आयोजन केले जाते. मुरुड जंजिरा हा या सहलींचा मोठा आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरतो आहे. कारण या किल्ल्यांमध्ये समुद्राच्या मध्यभागी असून सुद्धा गोड्या पाण्याची दोन मोठे सरोवर आहेत. शिवाय हा किल्ला समुद्राच्या मोठमोठ्या लाटांचा मारा झेलत अजून ही दिमाखात उभा आहे.

       मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी समुद्र किनाऱ्यावरती फिरण्याचा पाण्यात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, अकोला, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, अमरावती, पालघर, संभाजीनगर, परभणी, लातूर, चंद्रपूर सह संपूर्ण महाराष्ट्रातून शालेय सहली दाखल होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर