कोर्लई,ता.१०(राजीव नेवासेकर)कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष,प्रियदर्शनी फाऊंडेशनतर्फे पंडित नेहरू समाजरत्न पुरस्कार प्राप्त मुरुड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक संजय पांडुरंग गुंजाळ यांना रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य रजि.चा "कोकण रत्न पुरस्कार २०२५" जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे !
रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील मुंबई -गोवा हायवे लगत HP पेट्रोल पंप नजीकच्या गांधी मैदानात शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी सांय ६.०० वाजता रायगड सांस्कृतिक कला मंडळाच्या कोकण फेस्टिवल -२०२५ कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत संजय गुंजाळ यांना कोकण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मागील वर्षी सर्वद फाउंडेशनच्या कार्यक्रमात संजय गुंजाळ यांना "जीवन गौरव पुरस्कार -२०२५ प्रदान करण्यात आला आहे.
कला, साहित्य,सांस्कृतिक क्षेत्रातील संजय गुंजाळ यांचे कार्य उल्लेखनीय असून गेली वर्षे कलासागर नाट्य संस्थेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी राष्ट्रीय एकात्मता राखण्याचे यशस्वी काम केले आहे. सन २०११ चा ‘ॐ नम:शिवाय प्रतिष्ठान’चा ‘बाळशास्त्री जांभेकर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार, सन.२०१०चा रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनचा ‘सांस्कृतिक व कला पुरस्कार’ मिळाला आहे. शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
मुरुड नगरपरिषदेचे सलग पाच वेळा असे २५ वर्षे नगरसेवक पद ,१५ वर्षे शिक्षण ,कला, क्रिडा, सांस्कृतिक सभापतीपदी,मुरुड तालुका सुपारी संघ लि. चेअरमन, मुरुड ता. सुपारी संघ नियंत्रण मंडळ अध्यक्षपद ,मुरुड ता-एज्युकेशन सोसायटी संचलित पायोनियर इंग्लिश स्कूल चेअरमनपद, रायगड जिल्हा कोमसाप अध्यक्ष, म. फुले नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष, मुरुड माळी समाज अध्यक्ष ,'कलासागर नाट्यसंस्था मुरुड जंजिरा अध्यक्ष पदी,मुरुड तालुका समन्वय समिती अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम केले आहे.मराठी नाटक, मालिका (सिरियल) तसेच बारामती येथील माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या संस्थेकडून सन.२०१८ चा जीवनगौरव पुरस्कार,मराठी नाटक, मालिका (सिरियल), मराठी चित्रपटात अभिनय,२५ वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.
कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या सामाजिक सेवेची पोच पावती संजय गुंजाळ यांना रायगड सांस्कृतिक कला मंडळाचा कोकण रत्न पुरस्कार -२०२५ जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या