कोर्लई,ता.५(राजीव नेवासेकर)मुरुड पद्मदुर्ग लीग, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय व लायन्स क्लब मुरुड-जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९-०० वा.ते दु.१-०० वा.यावेळेत वसंतराव नाईक महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरातील मोतीबिंदू बाधित रुग्णांच्या शस्त्रक्रिया लायन्स हेल्थ फौंडेशनतर्फे चोंढी अलिबाग येथे मोफत करण्यात येणार आहेत.
मुरुड शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.असे लायन्स क्लबचे मुरुड शाखा अध्यक्ष सनी सोगावकर, उपाध्यक्ष संतोष तटकरे, सचिव स्मिता मुरंजन, खजिनदार मकरंद कर्णिक यांनी निमंत्रणाद्वारे कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या