Type Here to Get Search Results !

शाळेतील मुलांनी नातेवाईकाचे मोबाईल नंबर जवळ ठेवावेत-प्रा.डॉ.जयपाल पाटील


कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)शाळेत येतांना किंवा आई,वडीलासोबत रेल्वे,मेट्रो,एस.टीने  प्रवास करताना मुलांनी आपल्या  सोबत कायम आधार कार्डच्या झेरॉक्सच्या मागे नातेवाईकांचे मोबाईल क्रमांकाची चिठ्ठी ठेवावी.सध्या आपल्याकडे यात्राकाळ सुरु असुन घाई गडबडीत हरवलात तर पोलीस मामा,अथवा पोलीस मावशी जवळ जाऊन मोबाईल  चिठ्ठी दाखवावी म्हणजे तुम्ही सुरक्षित रहाल, अनोळखी माणसासोबत जाऊ नये.असे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा रायगड भुषण प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी राष्ट्रीय  केमिकल अँड फर्टीलायझर लि.भारत सरकार च्या इयत्ता 2री ते 4थी च्या 191 विद्यार्थीनां सांगितले.  

    यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची बांदिवडेकर ,सहा.शिक्षिका सुजाता पाटील,योगिता गवळे,जसवीर पनेकर आदी.व्यासपिठावर उपस्थित होते.                      

सुरुवातीला मुख्याध्यापिका प्राची बांदिवडेकर यांनी प्रा.डॉ.जयपाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यानंतर शाळेतील मुलांना घराशेजारी अथवा घरात आग लागली,कोठे गल्लीत किंवा खेळाच्या मैदानात भांडण होत असेल व महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस 112क्रमांक ,बाळंतपणा साठी 102क्रमांक ,अपघात झाल्यास  108 क्रमांकावर संपर्क साधून मदत घ्यावी, घरातील गॅस सिलेंडर विजेवर चालणारे साहित्याची काळजी,आजी,आजोबाच्या औषधाच्या गोळ्या देताना घ्यावयाची काळजी,त्यात बदल केला तर येणारी आपत्ती याची माहिती,आपणास शिक्षण  घेऊन मोठेपणी कोण व्हायचे आहे,आता पासुन ठरवावे.यावेळेस बस व टेम्पो रिक्षातून शाळेत कसे सुरक्षित यायचे यासाठी मावशी कविता गुरव,लेखनिक मैत्री म्हात्रे, शिपाई उज्वल घरत यांचे सहाय्य घेऊन व पालकांसमोर प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आले.यावेळेस 191 विद्यार्थी, 7 शिक्षक,2कर्मचारी उपस्थित होते. सहशिक्षिका अपर्णा गायकवाड यांनी आभार  मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर