Type Here to Get Search Results !

हाफिजखार येथे सेवापंधरवडा अभियानांतर्गत सर्वांसाठी घरे जमीन मोजणी मोहीम


कोर्लई,या.२६(राजीव नेवासेकर)छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून (दि. १७ सप्टेंबर २०२५) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान राबविण्यात येत असून त्याचाच भाग “सर्वांसाठी घरे” या मोहिमेअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरे नियमबद्ध करण्याच्या दृष्टीने मुरुड तालुक्यातील आगरदांडा -हाफिजखार येथे जमीन मोजणी मोहीम राबविण्यात आली.

   उपअधिक्षक भूमिअभिलेख (मुरुड)विनोद काळे,सर्वेअर सचिन घाडगे व प्रकाश भला यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय जमीनीवरील अतिक्रमित घरे नियमबद्ध करण्यात जमीन मोजणी मोहीम राबविण्यात आली.

   यावेळी आर्पेश चिंदरकर, जयेश भाटकर, संतोष कातकर, प्रवीण भाटकर व बबन चिंदरकर उपस्थित होते.या मोहिमेमुळे घरे नियमबद्ध करण्यास मोठा लाभ होणार असून शासनाचा उपक्रम यशस्वी ठरणार आहे, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर