Type Here to Get Search Results !

जनतेची कामे वेळेत पूर्ण करुन जनमानसात महसूल विभागाची प्रतिमा उंचावली पाहिजे : दुर्गा देवरे


बोर्ली-मांडला,ता.२(राजीव नेवासेकर) राज्याच्या महसूल मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्वत्र १ ऑगस्ट महसूल दिनी महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत पूर्ण करून सप्ताह परिणामकारक रित्या राबवून महसूल विभागाची प्रतिमा जनमानसात उंचावली पाहिजे.असे प्रतिपादन मुरुडमध्ये महसूल सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी दुर्गा देवरे यांनी केले.

    रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दुर्गा देवरे तहसीलदार आदेश डफळ यांच्या हस्ते तहसिल कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.उपविभागीय अधिकारी दुर्गा देवरे,तहसीलदार आदेश डफळ, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, माजी तहसीलदार नयन कर्णिक,नायब तहसीलदार संजय तवर, महसूल नायब तहसीलदार राजश्री साळवी, निवडणूक नायब तहसीलदार कल्याण देऊळगांवकर, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक,सेवक, पुरवठा अधिकारी यावेळी उपस्थित होते.

   सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी तहसीलदार आदेश डफळ यांनी महसूल दिनाचे महत्त्व विषद करून महसूल सप्ताहा अंतर्गत शासनाने दिलेल्या दैनंदिन उपक्रमांची माहिती दिली.यावेळी महसूल संवर्गातील सेवानिवृत्त तहसीलदार नयन कर्णिक यांचा उपविभागीय अधिकारी दुर्गा देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महसूल विभागातील कामांची माहिती व आलेले अनुभव नयन कर्णिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले तर निवासी नायब तहसीलदार संजय तवर यांनी महसूल सप्ताहा बाबत विविध पाणंद/शिव रस्ता मोजणी,वृक्ष लागवड, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान,घरभेटी देऊन डि.बी.टी.द्वारे अनुदान वाटप,M.D.Sand धोरण अंमलबजावणी आदी.विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

        यावेळी कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना पुरस्कार/ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अभ्यागतांना विविध दाखल्यांचे वाटप, जीवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सुधारित सातबारा उतारा, शिधापत्रिका वाटप करण्यात आले. विविध दाखले उत्पन्न व अधिवास यात प्रातिनिधिक स्वरूपात ६ लाभार्थ्यांना व ४ शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले तसेच जिवंत सातबारा (दुसरा टप्पा) मोहिमेअंतर्गत सातबारा वरील नाव दुरुस्ती/अ.पा.क.शेरा कमी करणे बाबतचे मी.ज.अ.अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये दुरुस्ती आदेशाचे वितरण ६ खातेदारांना यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण देऊळगावकर यांनी तर आभार मंडळ अधिकारी संतोष कचरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर