कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने सन.२०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी नियोजन केले आहे.चांगल्या प्रकारे नियोजन करून मुरुड तालुका क्षयरोग मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन तहसीलदार आदेश डफळ यांनी तहसील कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आयोजित बैठकीत केले.
यावेळी तहसीलदार आदेश डफळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल गो. राठोड, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मकबूल कोकाटे,डॉ.अक्षयकुमार सोळंके,डॉ. शितल कंधारे,डॉ. कृष्णा राठोड,डॉ. श्रीया मंगेश पाटील,डॉ.सपना खेमशेट्टे,डॉ.संजय पाटील, निनेश राजपूरकर,महेंद्र केशव मोहीते,विजय सुर्वे, सॅमसन सोगावकर,संजय शेडगे,डॉफैजान मिसरी, उज्वल अहिरे,सुभाष हुरदूके,दिपाली हजारे, संकेत घरत,विजय वाघमारे,उन्नती कचरेकर,दर्शना नाईक उपस्थित होते. यावेळी आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय २६ जणांची टी.बी.फोरम समिती स्थापन करण्यात आली, यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार आदेश डफळ, उपाध्यक्षपदी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ तर सचिवपदी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पायल राठोड असून या तालुकास्तरीय टी.बी.फोरम कमिटीमध्ये मुख्याध्यापक, एनजीओ, खाजगी डॉक्टर, खाजगी केमिस्ट, आरोग्य समुदाय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पत्रकार,STS, STLS, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
क्षयरोग (टी.बी)मुक्त मुरुड करण्यासाठी सूक्ष्म कृती आडखडा तयार करून काम करण्याचे तसेच क्षयरुग्णाच्या सानिध्य असलेल्या लोकांची तपासणी करण्यास सांगण्यात आले. तसेच शाळा, महाविद्यालय येथे क्षयरोगाची जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा व मार्गदर्शन करण्यास सांगून क्षयरोग अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००-११-६६६६ वर संपर्क साधण्याचा तसेच टी. बी. मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत मुरुड तालुक्यातील २०२५ मध्ये सर्व ग्रामपंचायती टी. बी मुक्त करण्याचे आवाहन आदेश डफळ यांनी यावेळी केले.
तालुक्यातील क्षयरुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार पद्धती, निदान,मागील वर्षातील झालेल्या कामकाजाची माहिती व तालुक्यात क्षयरोगाविषयी सुरु असलेल्या अभियानांची सविस्तर माहिती वरीष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक संकेत घरत यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. त्यांना नंतर माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी उपस्थित सर्वांना क्षयरोगाची लक्षणे, उपचार पद्धती, याबाबत मार्गदर्शन केले तसेच खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्ण शोधण्याचे आवाहन करून २०२५ पर्यंत मुरुड तालुका क्षयरोग मुक्त करण्याचा निर्धार केला.
मुरुड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती टी. बी मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्रित येऊन ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शिबिर घेऊन व जनजागृती करूया.असे आवाहन तालुका पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील यांनी केले तर समितीच्या सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पायल राठोड यांनी १०० डे.टी.बी कॅम्पेन मध्ये कामाची माहिती, २०२५ टी. बी मुक्त भारत अभियान, निक्षय पोषण योजना, Cy- Tb टेस्ट, TB प्रेवेन्शन ट्रीटमेंट व निक्षय मित्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन सर्वांना निक्षयमित्र बनण्याचे आवाहन केले. या आव्हानाला प्रतिसाद देत अध्यक्ष तथा तहसीलदार श्री. आदेश डफळ - २ क्षयरूग्ण, डॉ. कोकाटे - ३,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड-१,आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर -१,तालुका समूह संघटक प्राची चौलकर-१, आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे - १ यांनी निक्षयमित्र बनून क्षयरुग्ण दत्तक घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाघमारे, गणेश शिंदे, शालिकराव पावरा, प्राची चौलकर, मयुरी कदम, नंदकुमार घाडगे, प्रणय धसाडे , सिद्धी माने व दर्पणा चोगले यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार राजेंद्र चुनेकर यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या