कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर) पर्यटनात प्रसिद्ध असलेला मुरुड तालुक्यातील काशिद बीच पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला असून सुरक्षेचा उपाय रस्त्यालगत सुचना फलक व प्लॅस्टिक दोऱ्या लावण्यात आल्या आहेत.पर्यटकांनी सुचनांचे पालन करुन समुद्रात जाऊ नये.असे आवाहन ग्रामपंचायत,ग्रामस्थ, स्टॉलधारक, मुरुड पोलिस निरीक्षक यांच्यावतीने करण्यात आले आहे.
काशिद बीच समुद्रकिनाऱ्यावरील विविध खाद्यपदार्थ, खाद्यपेय स्टॉल्स यंदाही दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आले आहेत.
पर्यटनात याठिकाणी असलेल्या स्पिडबोट, बनाना बोट,पॅरोसेलिंग बोट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद करण्यात आल्या आहेत तसेच पावसाळ्यात येथील विविध स्टॉल्स दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आले आहेत.या कालावधीत येथे सुचना फलकावरील सुचनांचे पालन करुन पर्यटकांनी पोहण्यासाठी समुद्रात जाऊ नये. असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच स्टॉल्स धारकांतर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या