रेवदंडा,ता.२०(विशेष प्रतिनिधी)अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे पितृ दिनाचे औचित्य साधून एस. एम. न्यूज. मराठी चॅनेल तथा छावा पोर्टल न्युज मीडिया संस्थापक संपादक सचिन मधुकर मयेकर ओएसिस बहुउद्देशीय समाजाभिमुख संस्था, रेवदंडाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी या दोघांनी मिळून ३५ गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
पितृदिन म्हटलं कि अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर ठेवल. विशेष शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक वही, पेन, पेन्सिल अशा लेखन साहित्याचे वाटप केले.
पत्रकारिता जोपासत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, याबरोबरच वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेतून उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सचिन मयेकर यांनी सांगितले तर घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून, आम्ही आपापल्या परीने जबाबदाऱ्या निभावत आहोत. भावाची नववीची शाळा सुरू होण्याच्या तोंडावर साहित्याची अडचण होती, आणि अशा वेळी छावा पोर्टल व ओएसिस सामाजिक संस्थेतर्फे मिळालेल्या शालेय साहित्याचा चांगला सदुपयोग करणार असल्याचे लाभार्थी प्रियेशा लाड हिने सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या