रायगड (जिमाका) दि.21 :- मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांचा अतिरीक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्प पुणे उदय देशमुख यांनी दि.15 व दि.16 मे 2025 रोजी पाहणी दौरा केला. यावेळी रामेती-खोपोली कार्यालयास भेट देऊन स्मार्ट प्रकल्पांतर्गत सीबीओंच्या संचालक/प्रतिनिधी यांच्या प्रशिक्षण वर्गाचे प्रभावी आयोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर सुखकर्ता अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., खालापूर, वनराई अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि., पेण, आदिती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि., पेण, ज्ञानी अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी लि. अलिबाग या सीबीओंच्या प्रकल्पांना भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी सीबीओंच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले व पुढील कामाकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (MSRLM) विभागाअंतर्गत मंजुर सीबीओंच्या कर्ज मंजूरी व उपप्रकल्प उभारणीबाबत आढावा घेतला तसेच मार्गदर्शन केले.
या दौऱ्यावेळी स्मार्ट प्रकल्पातील भिमाशंकर पाटील नोडल अधिकारी, विभागीय अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, कोकण विभाग, ठाणे तसेच जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, रायगड कार्यालयातील श्रीम. वंदना शिंदे, प्रमुख तथा प्रकल्प संचालक (आत्मा) रायगड, सतिश बोऱ्हाडे, नोडल अधिकारी, दिग्विजय निचिते, पुरवठा साखळी व मुल्य साखळी तज्ञ तथा कृषि व्यवसाय सल्लागार व निकेशकुमार पोटभरे अर्थशास्रज्ञ तथा वित्त प्रवेश सल्लागार हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या