Type Here to Get Search Results !

मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वालवटी पाणी प्रश्न पेटला !


कोर्लई,ता.२२(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील वालवटी येथील पाणीप्रश्नी जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदाराचा कार्यारंभ आदेश रद्द करुन नवीन निविदा काढून आदेश द्यावा,दलित वस्ती मध्ये कोणतेही काम न करता लाखोंचा अपहार करणा-या तत्कालीन सरपंच व अधिका-यांवर त्वरित गुन्हा दाखल करून चौकशी करावी व सत्तर लाख खर्चून पेयजल योजनेचे अपूर्ण काम कधी कधी पूर्ण होणार याची लेखी हमी द्यावी.यामागणीसाठी वालवटी पाणी पुरवठा कमिटी तर्फे अध्यक्ष यशवंत पाटील, उपाध्यक्ष इन्तिखाब मुकरी सचीव शब्बीर खतीब, सदस्य नजीर नाखवाजी, सर्व समाज, ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून परेश नाका ते पंचायत समिती पर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.

    यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले.कार्यालयासमोर ठेकेदाराला शिक्षा झाली पाहिजे,वालवटी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, पाणी आताच सोडा नाही तर याठिकाणी मरुन जाऊ घोषणांनी महिलांनी आक्रोश केला !

 त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळला आणि पाणी पुरवठा कमिटी अध्यक्ष यशवंत पाटील उपाध्यक्ष इन्तिखाब मुकरी सचीव शब्बीर खतीब, शौकत नाखवाजी, शैलेश पाटील, नजीर नाखवाजी सहकारी यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.

      शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, आरपीआयचे तालुका अध्यक्ष ॲड.बबन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर,बाबू सुर्वे, ज्ञानेश्वर फलेभाई,रविकुमार मुंबईकर, आजीम हुर्जुक,शैलेश पाटील,साजीत कळवसकर, अर्शद मुकरी,मकबुल खतीब,नजीर नाखावजी,मनोज पाटील,मुबश्शीर फकी,जुनेद रामराजकर ,सिराज बोदले, आब्दन नाखवाजी आदिंसह शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या.

  मुरुड पंचायत समिती गटविकास अधिकारी - राजेंद्रकुमार खताळ, पाणीपुरवठा उप अभियंता निहाल चवरकर यांनी घटनास्थळी येऊन उपोषणकर्त्यांना  पत्र देऊन आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली असता ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नसल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला.यावेळी मुरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बडगर यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर