मुरुड,ता.१(प्रदीप बागडे) महाराष्ट्र राज्य मुक्त पत्रकार संघाचे राज्य सचिव तथा मुक्त पत्रकार न्यूजचे मुख्य संपादक रमेश देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड येथील जिल्हा परिषदेच्या गेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत मुरुड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन जम्मू काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मुक्त पत्रकार संघाची सन.२०२५ ची मुरुड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये जेष्ठ पत्रकार राजीव नेवासेकर यांची तालुका अध्यक्षपदी, संतोष रांजणकर यांची कार्याध्यक्षपदी, अजित कासार व प्रदीप बागडे यांची तालुका उपाध्यक्षपदी, नरेश वारगे यांची सचिवपदी,नैनिता नयन कर्णिक व संतोष पाटील यांची सहसचिवपदी तर पांडुरंग आरेकर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी नियुक्ती चे स्वागत केले.
मुरुडमध्ये काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अन्यायकारक मिळणारी वागणुक किंवा बेकायदेशीर अन्यायकारक गोष्टींना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजीव नेवासेकर यांनी सांगितले, याला सर्व सदस्यांनी एक मुखाने पाठिंबा दर्शविला तर काही अधिकारी शासनाने दिलेल्या अधिकारामुळे आणि गरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा उठवून योग्य न्याय मिळण्यापासून वंचित ठेवतात.अशावेळी मुक्त पत्रकार संघाची भूमिका निश्चितच झुकते माप मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल.असे सांगितले.सचिव नरेश वारगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर खजिनदार पांडुरंग आरेकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या