दरवर्षी 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय वन दिवसाची स्थापना 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे करण्यात आली. तेव्हापासून, जगभरातील लाखो लोकांनी सर्व प्रकारची जंगले साजरी करण्यासाठी, झाडे आणि जंगलांचे महत्त्व ओळखण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृती करण्याची संधी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
तालुक्यातील वाणदे येथील म.ह.दिवेकर विद्यालय व विहूर येथील प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वनपरिमंडळ अधिकारी राहुल कुलकर्णी व संतोष रेवणे यांनी विद्यार्थ्यांना वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यात महत्व पटवून शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा संकल्पना रुजविली ! कार्यक्रमाचे औचित्य साधून यादिवशी नांदगाव मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सरपंच सेजल घुमकर, सदस्य,जलमृदू संधारण अधिकारी, वनरक्षक किरण गायकर, मिलिंद धुरी,वनसेवक दिनेश रोटकर, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या