Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सिकई स्पर्धेत रायगडचे सुयश : शुभम नखातेला गोल्ड तर आकांश तांबडकरला सिल्वर पदक !

 राष्ट्रीय सिकई स्पर्धेत रायगडचे सुयश : शुभम नखातेला गोल्ड तर आकांश तांबडकरला सिल्वर पदक ! 

कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)जयपूर,राजस्थान येथे संपन्न झालेल्या २५ व्या सिनियर नॅशनल सिकई स्पर्धेत महाराष्ट्राने एक सुवर्ण, चार रजत व एक कांस्यपदक मिळविले असून रायगड जिल्ह्यातील शुभम महेंद्र नखाते याने सुवर्णपदक तर आकांश विजय तांबडकरने रजत पदक पटकावले !

  सिकई फेडरेशन ऑफ इंडिया आणि सिकई असोसिएशन ऑफ राजस्थान वतीने येथील जयपूर इंजिनिअर काॅलेज च्या क्रीडा संकुलात दिनांक १७ मार्च ते २० मार्च २०२५ दरम्यान संपन्न झाल्या.

     सिकई असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष मजहर खान , सचिव रवींद्र गायकी आणि संघ प्रशिक्षक विजय तांबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रतील एकूण सहा खेळाडूंनी भाग घेतला. यात रायगड जिल्ह्यातील दोन खेळाडूंची महाराष्ट्रातील संघात निवड झाली होती.  महाराष्ट्रातील खेळाडूंनी जबरदस्त लढत देत १सुवर्ण, ४ रजत आणि १ कांस्यपदक पटकावला. सदर स्पर्धेत लोबा फाईट या प्रकारात रायगड मधील अलिबागच्या शुभम महेंद्र नखाते यांने प्रथम क्रमाक  आणि नांदगावच्या आकांक्षा विजय तांबडकर हिने व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच नागपूर चे आनंद यादव व आर्यन बोरकर  यांना रजत आणि अमरावती च्या सुमित घरडे, रजत पदक व शुभम वानखेडे कांस्यपदक प्राप्त केले.त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर