मुरुडमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे गझलसंग्रह प्रकाशन सोहळा,भीमराव पांचाळे यांचे गझल गायन व लेखन मार्गदर्शन
कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)मुरुडमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे गझलकार योगेश महेंद्र दवटे यांच्या पहिल्या गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा गायक संगीतकार गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते रविवार दि.२३ मार्च रोजी नगरपरिषद शाळा क्र. ४ सभागृहात (दिंडी तळा) येथे सकाळी ठिक १०.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीरशेठ, जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण एल.बी.पाटील,तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के, ठाणे ललित कला फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप कारखानीस, मुरुड नगरपरिषदेच्या प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर,जेष्ठ शास्त्रीय संगीत गायक रवींद्र नामजोशी, मायबाप विठ्ठला गायक संगीतकार नितीन उगलमुगले,,गंधार इव्हेंट्स ॲंड एंटरटेनमेंटचे संस्थापक प्रसाद चौलकर, माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे,जेष्ठ गायक, लेखक,कवी,निवेदक सुबोध साने, सिनेअभिनेत्री प्रियांका पालकर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल गायन व लेखन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुरुड शाखा अध्यक्ष संजय गुंजाळ यांनी निमंत्रणाद्वारे कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या