Type Here to Get Search Results !

शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी : तहसीलदार रोहन शिंदे

 शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करून घ्यावी : तहसीलदार रोहन शिंदे 


कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)शासन शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. मात्र, या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा, यासाठी आता ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले नसेल, तर लवकरात लवकर ते पूर्ण करा; अन्यथा तुमच्या शिधापत्रिकेवरील लाभ बंद होण्याचा धोका आहे. असे आव्हान जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा सूचनेनुसार मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.

    ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिका आणि आधार कार्ड ही दोन महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्वप्रथम रेशनधारकांनी रेशनकार्ड दुकानात जाऊन दुकानदार तुमचा अंगठा रेशन दुकानात पोहोचल्यानंतर तिथल्या पॉस मशीनवर ठेवेल आणि तुमची ओळख सत्यापित करेल. मशीनवर तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.अशी माहीतीही तहसीलदार रोहन शिंदे व पुरवठा निरीक्षक निखिल तनपुरे यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर