मुरुडमध्ये क्षय रुग्णांना महानगर गॅस मार्फत कोरडा आहाराचे वाटप
कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)प्रधानमंत्री नीक्षय पोषण योजने अंतर्गत मुरुड तालुक्यातील क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत मध्ये येणारे क्षयरुग्णांना कोरडा आहार(फूड बास्केट)चे वाटप तहसीलदार रोहन शिंदे ,पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पायल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. सदर पोषण आहार
महानगर गॅस लिमिटेड यांच्या मार्फत पुरविण्यात आलेल्या पोषण आहार वाटप प्रसंगी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांनी निक्षय मित्र बद्दल माहिती दिली व निक्षय मित्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या आहाराचा रुग्णांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढून क्षयरोगावर लवकरात लवकर कशी मात करता येते व डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे घेतल्यास 100% क्षयरोग बरा होतो.याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार रोहन शिंदे यांनी क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये पात्र ग्रामपंचायतीचे कौतुक केले व उर्वरित ग्रामपंचायती ही क्षयरोग मुक्त करून 2025 पर्यंत मुरुड तालुका क्षयरोग मुक्त करण्याचे आव्हान केले. तंबाखू निर्मूलना बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी, वरीष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक संकेत घरत,गणेश शिंदे आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक राजेंद्रचुनेकर,मुख्याध्यापक,एनजीओ सदस्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या