मुरुडच्या अंजुमन इस्लाम महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा:सामूहिक वाचन व वाचनाचे महत्व कार्यक्रमाचे आयोजन
कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)नववर्षाच्या सुरुवातीलाच वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून '' वाचन संकल्प महाराष्ट्राचा '' हा व्यापक उपक्रम दि. १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच भावी उत्कृष्ट लेखक निर्माण करता यावे.यासाठी मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात कोंकण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख व ग्रंथालय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच भाग आज दि. १ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी सामुहिक वाचन तसेच वाचनाचे महत्व या कार्य्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना वाचनातून नवी दिशा देणारा असा हा स्तुत्य उपक्रम ठरणार असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय समिती प्रमुख प्रा. अलताफ फकीर, डॉ. फिरोज शेख , प्रा. जावेद खान व ग्रंथपाल प्रा. अंजुम दाखवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या