मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यापूर्वी भारतात महिलांची अत्यंत दयनीय अवस्था होती, समस्त स्त्रीयांना उजेडाची वाट दाखविणा-या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री यांबद्दलची चूल आणि मूल ही भावना मोडित काढली.त्यानी स्त्री शिक्षणाचा पाया घातला व सन्मानाचे जीवन मिळवून दिले.असे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी सांगितले.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.
प्रास्ताविक प्रा.डॉ.एन.एन.बागुल यांनी केले.
वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एस.एल.म्हात्रे,प्रा.डॉ.एन.एन.बागुल,प्रा.डॉ.सिमा नाहीद,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.प्रणव बागवे,प्रा.डॉ.एम.पी.गायकवाड, संदेश दांडेकर,मुहित हसवारे, अनघा विरकुड, अस्मिता सालदूरकर कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या