Type Here to Get Search Results !

NANDGAONनांदगावमध्ये वार्षिक कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न

 नांदगावमध्ये वार्षिक कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न 

कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर) मुंबईच्या इंडियन मार्शल ट्रेनिंग सेंटर तर्फे संस्थेचे अध्यक्ष अजय शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सोमवंशीय चौकशी समाज हॉलमध्ये नुकतेच पाच दिवशीय वार्षिक कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

    इंडियन मार्शल आर्ट्स ट्रेनिंग सेंटर गेल्या ३७ वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष अजय आर. शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या वार्षिक कराटे शिबिर आयोजित केले जात आहे.

  या शिबिरामध्ये वर्षभर मुलांनी केलेल्या मेहनतीची परीक्षा घेऊन त्यांची गुणवत्ता केली जाते. या शिबिरात फक्त कराटे नव्हे तर प्राचीन युद्धकला तसेच विविध शस्त्रकला पारंगत व्यक्तींकडून शिकवल्या जातात. मुंबई, उल्हासनगर, ठाणे अश्या विविध जिल्ह्यांमधून जवळजवळ २००-२५० खेळाडू दरवर्षी सहभाग घेत असतात. हे पाच दिवसीय शिबिर दिनांक २८ डिसेंबर २०२४ ते दिनांक १ जानेवारी २०२५  या कालावधीत संपन्न झाले.

        या शिबिरात व्हाईट बेल्ट पासून ब्लॅक बेल्ट व डिग्री पर्यंत सर्वांची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी लागणाऱ्या सर्व घटकांची तयारी अध्यक्ष अजय आर. शाह, उपाधक्ष शिवम गुप्ता व  वरिष्ठ प्रशिक्षक लोचन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.यावेळी सर्व यशस्वी कराटे शिबिरार्थींना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर