मुरुडच्या अंजुमन महाविद्यालयात ग्रंथ दिंडी
कोर्लई,ता.४(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीला महाविद्यालयाच्या आवारातून सुरुवात झाली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीची रुजवात करणे आणि ग्रंथालयाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा होता.
ग्रंथ दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे फलक व वाचनप्रेरणादायक संदेश घेऊन महाविद्यालयाच्या परिसरातून मुख्य शहरातील विविध भागांतून फेरफटका मारला. “वाचाल तर वाचाल”, “ग्रंथ हेच गुरू” यांसारख्या घोषणांनी शहराचे वातावरण आनंदमय झाले. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्र. प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्याकार्माचा आयोजन करण्यात आला. शेवटी ग्रंथालय समिती प्रमुख प्रा. अलताफ फकीर यांनी ग्रंथ दिंडीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे "ग्रंथ दिंडी हा वाचनसंस्कृती वाढवण्यासाठीचा प्रभावी उपक्रम असून, यामुळे वाचनाबद्दलची रुची विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच वाढेल," असे प्रतिपादन त्यांनी केले.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी ग्रंथपाल प्रा. अंजुम दाखवे, प्रा. जावेद खान, डॉ. फिरोज शेख आणि इतर शिक्षकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक स्तरावर या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले असून, हा स्तुत्य उपक्रम वाचनसंस्कृतीला नवी दिशा देणारा ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या