४८ वर्षाच्या इसमा डोक्यात नारळ पडून दुर्दैवी मृत्यू
कोर्लई,ता.६(राजीव नेवासेकर)मुरुड समुद्रकिनारी शहाळे खरेदी करण्यासाठी गेले असताना राजपुरी गावातील 48 वर्षाच्या इसमाचा डोक्यात नारळ पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जयेश पांडुरंग गीते असे या मृत इसमाचे नाव आहे. राजपुरी येथील शिव मंदिरामध्ये अभिषेक पूजेसाठी शहाळे खरेदी करण्यासाठी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मुरुड समुद्रकिनारी श्रीयश रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चंदन खोत यांच्या शहाळे स्टॉलवरून शहाळे खरेदी करून निघण्याच्या तयारीत असताना येथे असलेल्या 90 फूट उंच नारळाच्या झाडावरून वेगाने नारळ डोक्यात पडल्याने जयेश तिथल्या तिथेच जागीच गतप्राण झाला. या मृत्यू नंतर संपूर्ण मुरुड तालुक्यासह राजपुरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या