वावडुंगी -महालोर येथून २६ वर्षीय महिला बेपत्ता
कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यामधील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दिमधिल महालोर येथील खान यांच्या बागेतील झोपड्यामधून लीला रोहिदास हंबिर वय २६ वर्ष या कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. याबाबत त्यांची आई ताई पांडुरंग शिद यांनी मुरुड पोलीस ठाण्यात मीसिंग ची तक्रार दाखल करताच मुरुड पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत. लीला हंबीर या अंगाने सडपातळ आहेत. गोल चेहरा आहे. हनुवटीवर गोंडवल्याचे डाग आहेत. नाक सरळ आहे. या बाबत सदरील महीलेबाबत कोणासही काही माहिती पडल्यास तातडीने मुरुड पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत मुरुड पोलिसांनी मिसींग महीले बाबत सर्व ठिकाणी कसून चौकशी सुधा केली आहे. मिसिंगचा बारकाईने तपास चालू असून देखील तसेच तिच्या नातेवाईकांना व ओळखीच्या सर्व माणसांना भेट देऊन सविस्तर माहिती घेतली असताना देखील आज पावतो मिसिंग व्यक्ती मिळून आलेली नाही. याबाबतचा तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या