Type Here to Get Search Results !

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान

 मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान 

कोर्लई,ता.१८(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात रायगड पोलीस अंतर्गत मुरुड पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना जानेवारी 2025 अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

    यावेळी  मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, प्राचार्य डॉ.जे.के. कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस.भैरगुंडे,प्रा. डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एस.एल.म्हात्रे, वाहतूक शाखा अंमलदार पी.एस.आय.गायकवाड, पी.एन.बठारे, पी.सी. पाटील,पी.सी. लोहार व 100 ते 120 विद्यार्थी व शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

     यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 1) दुचाकी वाहन चालवीताना हेल्मेटचा वापर करावा.

2) चारचाकी वाहन चालवीताना सीट बेल्टचा वापर करावा.3)वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवू नये.

4) मद्य प्राशन करून वाहन चालवू नये 5) वाहन चालवीताना लेन कटिंग करू नये.6) पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करू नये.7) वाहन चालवीताना मोबाईल चा वापर करू नये.8) रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन चालवू नये.9) पदचाऱ्यांनी झेब्राक्रासिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा.10) वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावा.याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर