मजगांवच्या ओम् मल्हारी श्रीदत्त देवस्थानतर्फे श्रीदत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम
कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील मजगांव येथील ओम् श्रीदत्त देवस्थानतर्फे Datta jayanti निमित्ताने दि.८ डिसेंबर ते दि.१५ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार दि.८ डिसेंबर (आज) रोजी उत्सवाला सुरुवात होत असून वीणा पुजन, श्रीगुरुचरित्र ग्रंथ पारायण, दत्त स्तुती, भजन, हरिपाठ व रात्री ९ -०० वा.ह.भ.प.दिनेश महाराज गोसावी,दि.९ डिसेंबर रोजी ह.भ.प.किर्तनकेसरी विकास महाराज देवडे,दि.१० डिसेंबर रोजी ह.भ.प.रामणाचार्य गोपनीय महाराज पाटील आळंदी देवाची,दि.११ डिसेंबर रोजी झी टॉकीजचे फेमस ह.भ.प.बाळासाहेब महाराज शिंदे (जालना),दि.१२ डिसेंबर रोजी ह.भ.प.तथा आवाजाचे जादुगार कवीराज महाराज झावरे,दि.१३ डिसेंबर रोजी महिला किर्तनकार हे.भ.प.वाणीभूषण शिवचरित्रकार गीतांजली ताई झेंडे,दि.१४ डिसेंबर रोजी ह.भ.प.सुदाम महाराज पालवे,दि.१५ डिसेंबर रोजी ह.भ.प.सुदाम महाराज पालवे यांचे सुश्राव्य बहारदार किर्तन होणार आहे तसेच दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ५-३० वा.श्रीदत्त मुर्तीला सार्वजनिक अभिषेक,स.८-०० वा.श्रीगुरुचरित्र ग्रंथ समाप्ती, स.१०-०० वा.भिक्षेची फेरी, सायं.७-०० वा.ते सायं.९-०० वा.श्रीदत्तजन्म किर्तन व रविवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ८-०० वा.विश्वसुख शांती यज्ञ, सकाळी १०-०० वा.काल्याचे किर्तन,नाम सप्ताह समाप्ती, दुपारी १-०० वा.श्रीं.चा महाप्रसाद आणि सायंकाळी ५-०० वा.श्री चा पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला असून या Datta jayanti सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.असे आयोजक श्रीदत्तगुरु परिवार व ओम् मल्हारी श्रीदत्त देवस्थानतर्फे महेश गोसावी,अवधुत गोसावी यांनी निमंत्रणाद्वारे कळविण्यात आले आहे.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या