Type Here to Get Search Results !

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात संविधान दिन साजरा

संविधान दिवस हा संपूर्ण भारतियांसाठी सोनेरी दिवस : ॲड.विद्या देऊळकर * मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात संविधान दिन साजरा 

Raigad maza news

कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) आपल्याला बोलण्याची संधी नव्हती, विचार मांडण्याची पाबंदी होती,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान यामुळे अंधारी रात्र सरुन उष:काल झाला.संविधानाने जगण्याचा हक्क निर्माण झाला, या संविधान कॉंन्स्टिट्यूशन ला राष्ट्रीय कायदा दिवस म्हटले जाते.असे प्रतिपादन मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात संविधान दिवस निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी विद्यार्थीनी तथा ॲड.विद्या देऊळकर यांनी केले.

   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, ॲड.विद्या देऊळकर , ॲड.मनाली सतविडकर,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ एस एस.भैरगुंडे,प्रा.डॉ.जी.डी.मुनेश्वर,प्रा.डॉ.एस.एल.म्हात्रे,प्रा.डॉ.एन.एन.बागूल,प्रा.डॉ.सीमा नाहिद,प्रा.चिंतन पोतदार,प्रा.प्रणव बागवे, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

      यावेळी बोलताना ॲड.विद्या देऊळकर यांनी सांगितले कि,आज मी जे शिक्षण घेतले आणि तुमच्या समोर उभी आहे ती या संविधानामुळेच.शिक्षणामुळे माणसाकडे दूरदृष्टी, प्रगल्भता, मुक्ती संपन्न, तत्ववेत्ता विद्वान होण्याची संधी संविधान व शिक्षण देते, संविधानामुळे जात, धर्म,भेद,वर्ण,पंथ याचा भेदभाव कुठे ठेवलेला नाही तर आपल्याला एकात्मतेने कसे जगावे हे शिकवले आहे.न्यायासाठी लढा देणे व न्याय मिळवणेही संविधानाने शिकवले आहे.हे सर्व ज्ञान दान रुपाने आपल्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ॲड.मनाली सतविडकर यांनी आपले विचार मांडले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रा.डॉ.एम.पी.गायकवाड यांनी मानले.

_______________________________________ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर