कोर्लई,१५ (राजीव नेवासेकर)आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी सुरु असून प्रचारात रंग भरु लागला असून अलिबाग -मुरुड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ मुरुडचे पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळ सरसावले असून मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांच्या हस्ते श्री हनुमान मंदीरात श्रीफळ वाढवून डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला.
पद्मदुर्ग कल्याणकारी व्यावसायिक मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर,उपाध्यक्ष दिव्य सत्व बिडकर,दीपक जोशी.,देवेन सत्सतविडकर, दिवेश बोरदे,शकील शाबंद,इम्तियाज साबंद,दामोदर खैरगावकर,कविता खरेगावकर,शैलेश वारेकर,उमेश दांडेकर,रुपेश पाटील,उत्तम पाटील सदस्य, अलिबाग -मुरुड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी केलेली विकासकामे, त्याचे विचार मतदारांपर्यंत पोहोचवून डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला.
आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत अलिबाग -मुरुड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्रशेठ दळवी विकासकामांच्या जोरावर निश्चितपणे निवडून येतील.असा विश्वास अरविंद गायकर यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या