Type Here to Get Search Results !

पेण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक




Raigad Maza News
Raigad maza news

रायगड(जिमाका)दि.08:- विधानसभा निवडणूक 2024  मध्ये 191-पेण विधानसभा मतदारसंघात एकूण 07 अधिकृत उमेदवार असून अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक खर्चाची प्रमाणके व उपप्रमाणके, रोख रक्कम तपशील इत्यादी व निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खालीदिलेल्या तारखांना मा.निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी  प्रविण पवार यांनी केले आहे.

या खर्चाच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या लेख्यांची तपासणी, निवडणूक खर्चावर देखरेख सूचनांचा सारसंग्रह 2024 मधील भाग-क (एक) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार प्रचार कालावधीत किमान तीन वेळा होणे आवश्यक आहे. त्यानुसार मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक, 191-पेण विधानसभा श्री.रमेश कुमार हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी पुढील नमूद वेळापत्रकानुसार करणार आहेत.

मा.निवडणूक खर्च निरीक्षक, 191-पेण विधानसभा यांच्यामार्फत उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- प्रथम, दि.9 नोव्हेंबर 2024 वेळ सकाळी 10.00, द्वितीय, दि.13 नोव्हेंबर 2024 वेळ सकाळी 10.00, तृतीय, दि.17 नोव्हेंबर 2024 वेळ सकाळी 10.00, स्थळ:- उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण, ता.पेण.

सदर तपासणीवेळी उमेदवाराने आपले खर्च रजिस्टर नोंदवही विहित पद्धतीने सादर न केल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 व भारतीय दंडसंहितेच्या कलम 177 अन्वये पुढील कार्यवाही प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर