Type Here to Get Search Results !

विधानसभा निवडणूक-2024 पूर्वपिठीकीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन


रायगड(जिमाका)दि.07:-प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड-अलिबाग पूर्वपिठिका-2024 निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे कौतुक केले. 

यावेळी निवडणूक निरीक्षक संतोष कुमार राय, दुलीचंद राणा, सतीश कुमार एस, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रविकिरण कोले यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर