
रायगड जिमाका दि.२१:रायगड जिल्हयातील सर्व माजी सैनिक/विधवा/ अवलंबीत जे डिफेन्स पेंशन धारक आहेत आणि ज्यांची पेंशन स्पर्श पोर्टल मध्ये स्थलांतर झालेली नाही अशा माजी सैनिक/विधवा/अवलंबीतांनी कार्यालयीन दिवशी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत भेट दयावी. असे आव्हान करण्यात आले आहे.
तसेच पोलादपूर, महाड व माणगांव तालुक्यातील माजी सैनिक/ विधवा/ अवलंबीत यांनी आव्हान करण्यात येत आहे की, जे माजी सैनिक/विधवा/ अवलंबीत डिफेन्स पेंशन धारक आहेत ज्यांची पेंशन स्पर्श पोर्टल मध्ये स्थलांतर झालेली नाही अशा माजी सैनिक/विधवा/अवलंबीतांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग कार्यालयाचे प्रतीनीधी खाली दिलेल्या दिवशी तालुक्यांना भेटी देणार आहेत. ते पुढीलप्रमाणे-
१) तालुका माणगांव दि. ०२/१२/२०२४ (सोमवार) दौऱ्याचे ठिकाण - माणगांव तहसिलदार कार्यालय व माजी सैनिक संघटना कार्यालय, माणगांव,२) तालुका पोलादपूर दि. ०३/१२/२०२४ (मंगळवार) ते दि. ०५/१२/२०२४ (गुरुवार) दौऱ्याचे ठिकाण - पोलादपूर कचेरी कार्यालय,३) तालुका - महाड- दि. ०६/१२/२०२४ (शुक्रवार) ते दि. ०७/१२/२०२४ (शनिवार) दौऱ्याचे ठिकाण- सैनिकी विश्रामगृह महाड नवेनगर
आवश्यक ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे :- १) मूळ ओळखपत्र व त्याची छायांकीत प्रत,२) मूळ पीपीओ व त्याची छायांकीत प्रत, ३) डिस्चार्ज बूक व छायांकीत प्रत४) आधार कार्ड व पॅन कार्ड छायांकीत प्रत,५) बँक पासबूक व छायांकीत प्रत,६) मोबाईल नंबर.
तरी माजी सैनिक/विधवा/ अवलंबीत डिफेन्स पेंशन धारक आहेत ज्यांची पेंशन स्पर्श पोर्टल मध्ये स्थलांतर झालेली नाहीत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ले.कर्नल वैजनाथ माने,(नि.) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या