* सामाजिक कार्यकर्ते शरद गोंधळी यांच्याहस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन
कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव मंदिरात श्री काळभैरव जन्मोत्सव किर्तन, रांगोळी स्पर्धा, मनोरंजनात्मक ऑर्केस्ट्रा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
श्री काळभैरव जन्मोत्सव उत्सव सन 1969 साल पासून रेवदंडा श्री हरेश्वर मंदिर या ठिकाणी आजतागाय सुरू असून यावर्षी उत्सवाला यंदा 57 वर्ष पूर्ण होत आहेत.
सन.1969 साल पासून तुकाराम चुनेकर, यशवंत पिटनाईक व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्याकाळी या कार्यक्रमाला मनोरंजन ते स्वतः व त्यांचे सहकारी नाटक आयोजित करत असत. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव चुनेकर तसेच कार्यकारणी सामाजिक कार्यकर्ते शरद गोंधळी,कुमार तांबडकर,राजू चूनेकर व सर्व कार्यकारिणी मंडळ या जन्मोत्सव सोहळ्यात आवर्जून सहभागी होत असून सन 2005 पासून सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद आयोजित केलेला असतो.
रांगोळी प्रदर्शन. फनी गेम्स. महिलांसाठी संगीत खुर्ची. सायंकाळी भजन,कीर्तन,ऑर्केस्ट्रा.इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हा सार्वजनिक उत्सव रेवदंडा गावातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून समजला जातो.रेवदंडा व आजुबाजूच्या परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या