Type Here to Get Search Results !

आरसीएफ थळतर्फे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन



रायगड , दि.16: (जिमाका)-  आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय केमिकल्स अँड  फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळतर्फे सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमध्ये शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाव्यवस्थापक मानव संपदा हरळीकर यांसह कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे  निर्देश आहेत. या अनुषंगाने कारखान्यातील कामगारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने 192 अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी आरसीएफ व्यवस्थापनाला एका पत्राद्वारे  आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आरसीएफ थळ तर्फे सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमध्ये मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महा व्यवस्थापक मानव संपदा व प्रशासन संजीव हरळीकर, मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक (प्रभारी) महेश पाटील, वरिष्ठ मानव संपदा व्यवस्थापक प्रशांत म्हात्रे,  वरिष्ठ व्यवस्थापक हितेश थळे(मानव संपदा विकास), वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांसह कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर