Type Here to Get Search Results !

30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा


रायगड माझा न्यूज

रायगड (जिमाका) दि.15:-मा. उच्च न्यायालय, मुंबई द्वारे विधी सेवा प्राधिकरणाचे सहकार्य घेत दि.30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विशेष लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रायगड अलिबाग ए. एस. राजंदेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी केले आहे...

न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे आपसी सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोक अदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आले आहे. लोक अदालतीच्या माध्यमातून अनेक पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढली आहेत...

लोक अदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रलंबित प्रकरणातील पक्षकार यांच्या सोबतच शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहे. तसेच लोक अदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आले आहे. लोक अदालतीचे यश लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने प्रलबित असलेले तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्याकरीता विशेष लोक अदालतीचे आयोजन दि.30 नोव्हेंबर व 01 डिसेंबर 2024 रोजी केले आहे. प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे...

"जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित आहेत. त्यांच्याकरिता आपली प्रकरणे आपली समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता ही एक सुवर्ण संधी मुंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्या सुवर्ण संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर