Type Here to Get Search Results !

निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट



 

रायगड, (जिमाका) दि.22 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

  जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते.  यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या कक्षाचा सहभाग आहे या बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.

  राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिली. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर