कोर्लई,ता.९(राजीव नेवासेकर) रस्त्यांवरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अपघात मुक्तीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.के.साळे यांनी लायन्स इंटरनॅशनल क्लब तर्फे ऑक्टोबर सर्व्हिस विक कार्यक्रमांतर्गत वेश्वी -गोंधळपाडा येथील पी.एन.पी.एज्यूकेशन सोसायटीच्या होली चाईल्ड स्कूल मध्ये सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या सौजन्याने लायन्स क्लब ऑफ श्रीबागतर्फे वाहतूक सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबीराप्रसंगी केले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन शिवरायांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कोकण विभागीय समादेशक लायन डॉ.श्रीकांत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात आजच्या कार्यक्रम आयोजनाबाबत विचार मांडले.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमातील आर.एस.पी.विषयाचा चांगला अभ्यास करून वाहतुकीच्या नियमांचे स्वतः पालन करुन इतरांनाही करण्यास सांगावे, त्यामुळे निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होईल.पालक, शिक्षक व स्वतः स त्रास होईल. असे वर्तन करु नये,देशाचा उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करावा.असेही यावेळी पोलीस निरीक्षक पी.के.साळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी डॉ.ॲड.निहा राऊत,एन.आर.परमेश्वरन यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक पी.के.साळे, लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पी.एम.जे.एफ
एन.आर.परमेश्वरन, सेकंड व्ही.डी.जी.प्रविण सरनाईक,जी.एस.टी.गव्हर्नर विजय गणात्रा, मुर्ती, लायन रमाकांत म्हात्रे, लायन संगीता म्हात्रे, रिजनल चेअर पर्सन विजय वनगे,फाऊंडर प्रेसिडेंट लायन डॉ.ॲड.निहा राऊत, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटेनिअल अध्यक्ष डॉ.ॲड.के.डी.पाटील,व्हाईस प्रेसिडेंट लायन डॉ.श्रीकांत पाटील, रिजनल सेक्रेटरी लायन संदीप वारगे, लायन तानाजी भोसले,लायन प्रकाश पाटील, लायन विजय गायकवाड, लायन पैठणकर, लायन शिद,निवृत्त मुख्याध्यापक आर.एच.ठाकूर ,आर.एस.पी.शिक्षक रमेश म्हात्रे,पी.एन.पी.हायस्कूल स्टाफ उपस्थित होता.शेवटी श्रीकांत पाटील व प्राचार्या निसर्ग चेवले यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या