कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर)नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सून ने मंगळवार दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी देशाचा निरोप घेतला तरी जाता जाता या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले सडक तिसऱ्या दिवशीही मुरुडला हजेरी लावली विजांच्या गडगडाटासह मुरुड मध्ये पाऊस बरसला यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे दैवत कृपेने मोठे नुकसान झालेले नाही वातावरणात प्रचंड उकाळा जाणवत असला तरी या पावसामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील बोरली मांडला, कोर्लई, बार्शीव, काशीद, सर्वे, नांदगाव, मजगाव आगारदांडा, सावली, उसडी, नांदले, टोकेखार, तेलवडे, खारआंबोली, या परिसरात पाऊस वीजांच्या कडकडाटासह हजेरी लावून गेला.या पावसामुळे तालुक्यातील जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या