Type Here to Get Search Results !

आगरदांडा -रोहा रेल्वेमार्ग संयुक्त मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनास सादर केल्या जातील : मुकेश चव्हाण * मोजणी नंतरही मागण्या मान्य न झाल्यास काम करु देणार नाही : प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक होणार असा प्रशासनास इशारा!


कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)दिघी येथे होणाऱ्या अदानी पोर्टच्या कामात आगरदांडा -रोहा रेल्वेमार्गाची संयुक्त मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनास सादर केल्या जातील.असे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी मुरुड येथील दरबार हॉल मध्ये आयोजित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.या मार्गाची मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास काम करु देणार नाही.असा शेतकऱ्यांचा सूर दिसून आला.

   रोहा जंक्शन ते आगरदांडा पोर्ट रेल्वे (कॉरिडॉर ) संदर्भात मुरुड दरबारहॉल येथे नांदले,उसडी येथील बाधित  शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व  हरकतीवर उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण,तहसीलदार रोहन शिंदे,अदानी पोर्टचे अधिकारी आणि मुरुड विभागातील शेतकरी यांचे समवेत रोहा ते आगरदांडा अदानी रेल्वे लाईन भूसंपादन संयुक्त मोजणी (JMR) करणे कामी शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी सर्व शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली असता, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या असता संयुक्त मोजणी झाल्यावर प्रशासनास शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनास सादर केल्या जातील असे आश्वासन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या वतीने नथुराम माळी यांनी प्रशासनास इशारा दिला आला कि, मोजणी झाल्यानंतर  जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासन मान्य करणार नाही,तोपर्यंत कोणतेही अदानी रेल्वे समूहास काम करू देणार नाही.! 

   तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी खुशाल राठोड, तलाठी सपना वायडे, पूजा विरकुड,शेतकरी प्रतिनिधी नथुराम माळी,अंकुश मिसाळ,हरिश्चन्द्र पाटील,रमेश पाटील,अस्लम कादरी व समस्त शेतकरी उपस्थित होते. यावेळी आगरदांडा येथील शेतकऱ्यांनी रेल्वे मार्ग वळविणे बाबत हरकती नोंदविल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर