कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक वाहकांना प्रवासी भत्ता द्यावा.अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांची भेट घेऊन केली.
यावेळी एसटी वाहक चालकांना प्रवासी बोनस योजना सुरू करणे बाबत,कोविड 19 च्या महामारीत एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली होती, त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठांना मोफत प्रवास महिलांना अर्धे तिकीट यामुळे एसटी महामंडळाने पुन्हा उभारी घेतली आहे प्रवाशांसमोर एसटीचे पहिले कारभारी दिसतात ते आपले वाहक व चालक यांच्यामुळेच एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढत आहे मात्र एसटी स्थानकातून सुटली आणि बाहेर काही थांब्यांवर प्रवासी हात दाखवीत असतात तरी वाहक गाडी थांबवत नाही रात्रीच्या वेळी जलद गाड्या काही थांब्यांवर चालक थांबवीत नाहीत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर जेष्ठ नागरिकांना एसटीच्या डेपो मधून अधिक भाड्याची रिक्षा करून गावात यावे लागते हाही भुर्दंड त्यांना पडतो यासाठी पूर्वी वाहक चालक यांना प्रवासी भत्ता मिळत असे त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील वाहक चालकांना प्रवासी भत्ता सुरू करावा,अधिक प्रवासामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढेल,प्रवासी मोठ्या संख्येने सुरक्षित प्रवास म्हणून एसटीचाच वापर करतील.आपल्या जिल्ह्यातून कर्नाटक एसटी मुंबईकडे जा-ये करीत असते,त्यांचे वाहक चालक आपल्या प्रवाशांना बोलावून गाडीमध्ये घेतात कारण त्यांचं मंडळ त्यांना प्रवासी भत्ता देत आहे .या सूचनेचा गांभीर्याने व तातडीने विचार करावा आणि महाराष्ट्रातील आपले कर्मचारी वाहनचालकांना प्रवासी भत्ता देऊन न्याय द्यावा.अशी मागणी जयपाल पाटील यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या