Type Here to Get Search Results !

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती


कोर्लई, ता.२१(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या  नांदगावच्या शिवशाही प्रतिष्ठान आयोजित साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे बाजारपेठेतील नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदाच्या पुजेचा मान सरपंच सेजल सुदेश घुमकर, उपसरपंच मेघा महेश मापगांवकर, सुजाता दिनेश शाहपूरकर,ऋतुजा नितेश रावजी यांना मिळाला.

    नांदगाव मधील शिवशाही प्रतिष्ठान साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने सन.२०१३ पासून साखर चौथ गणपती बसविला जात असून यंदाचे बारावे वर्ष आहे. या आयोजित सोहळ्यामध्ये प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून महेश मापगांवकर,सुदेश घुमकर,शैलेंद्र दिवेकर,विलास सुर्वे, उदय थळे, सुयोग इंदुलकर, सुमित कांबळे,मनोहर (नाना) दिवेकर,दिनेश शाहपूरकर,नरेश कुबल, शैलेंद्र शशिकांत दिवेकर यांना साखरचौथ गणपती पुजेचा मान मिळाला. 

      नांदगाव च्या विघ्नहर्ता साखरचौथ गणपतीचे शुक्रवार दि.२० सप्टेंबर २०२४रोजी आगमन झाले. शनिवार दि.२१ सप्टेंबर  २०२४रोजी सकाळी ९.०० वा.श्री मुर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना, आरती करण्यात आली. यानिमित्ताने सायंकाळी ७.०० वा. ते रात्री ९.०० वा. महाराष्ट्रातील प्रख्यात बुवा समीर कदम यांच्या संगीतसंध्या भजनाचा सुश्राव्य बहारदार कार्यक्रमाने रसिक जनांची मने रिझवली!,कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्री१०.०० वा. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व रात्रौ १२.०० वा.महाआरती घेण्यात आली. यावेळी भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दि.२२ सप्टेंबर  २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. विधिवत पूजा अर्चा, दुपारी १.०० वा.आरती व सायंकाळी ६.०० वा.श्री मुर्ती ची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन  विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे.

   शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदेश घुमकर, उपाध्यक्ष नितेश रावजी,खजिनदार महेश कोतवाल,सभासद तसेच गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष दिनेश शाहपूरकर, उपाध्यक्ष ओमकार साखरकर, सदस्य,मान्यवर ग्रामस्थ यांनी साखरचौथ गणपती सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. 

     (फोटो घेणे )

---------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

फॉलोअर