कोर्लई,ता.२१(राजीव नेवासेकर)मुरुड पंचायत समितीत मुरुड तालुका विधी सेवा समिती वकील संघ मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरीक, अल्पवयीन मुले व महिलांचे हक, महिलांच्या सुरक्षा व गोपनीयता, पिडीतांसाठी नुकसान भरपाई योजना, दुष्काळ पुर औद्योगिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना शासकीय योजना या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी ॲड.डी.एन.पाटील यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले तर ॲड. ए. ए. चोगले यांनी अल्पवयीन मुले व महिलांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले आणि ॲड.एम.जे.तांबडकर यांनी पिडीतांसाठी नुकसान भरपाई योजना इ.बाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांनी जेष्ठ नागरीक, अल्पवयीन मुले व महिलांचे हक्क, महिलांच्या सुरक्षा व गोपनीयता, पिडीतासाठी नुकसान भरपाई योजना, दुष्काळ,पूर औद्योगिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींसाठी शासकीय योजना यासंबंधी सर्विस्तर मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, यांनी थोडक्यात आपले विचार मांडले व शेवटी आभार प्रदर्शन केले.
सदर कायदेविषयक शिबीरात तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश घन:श्याम तिवारी, मुरुड वकील संघाचे सचिव ॲड.डी.एन. पाटील, ॲड .एम. जे. तांबडकर, ॲड.ए.ए. चोगले व ॲड.श्रीमती एम.एस. सतविडकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय शेडगे, पर्यवेक्षिका शुभांगी कोतवाल,विजया खेऊर, १२० ते १२५ अंगणवाडी सेविका, त्यांच्या सहाय्यक, आशा वर्कर आदी.उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयाचे कर्मचारी मतीन अधिकारी, माळी, इंगळे, घुगे व पंचायत समितीचे वाघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या