कोर्लई,ता.३०(राजीव नेवासेकर) अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील सुमित्र ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नवखारकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सुमित्र ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दहावी व बारावी इयत्तेतील गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार व सामाजीक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कुतिक क्षेत्रात विशेष कार्याने प्रसिध्दीस असलेल्या सामाजीक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रमोद कमळाकर नवखारकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कमळाकर साखळे यांनी भुषविले तर उपाध्यक्ष खलिल तांडेल, संचालक महेंद्र नाईक, संचालक उमेश कोंडे,संचालक राजेंद्र वाडकर, संचालक अशोक जाया हवालदार, संचालक विजय सखाराम चौलकर, संचालक सदानंद शंकर घरत, संचालक प्रतिभा शरद वरसोलकर, संचालिका कमरजब्बीन मुज्जफर मुकादम,संचालक सलिम अब्बास तांडेल,तज्ञ संचालिका मालती मधुकर ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक हरी नागांवकर यांची उपस्थिती व्यासपिठावर होती.
कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता लोकांच्या सुख दुःखात धावून जावून सहकार्य करण्याचा आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल म्हणून आमच्या पतसंस्थेकडून छोटीशी पोच पावती. प्रमोद नवखारकर यांचा सुमित्र ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतर्फे सन्मान करण्यात आल्याबद्दल आप्तेष्ट मित्रपरिवार नातेवाईक व मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
________________________________________
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या