कोर्लई,ता१७(राजीव नेवासेकर)मुरुड मधील शेखवीर पाखाडी येथील अमृता जंजिरकर यांनी त्यांच्या वाडीमध्ये कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या भारद्वाज पक्षाला वाचवून जीवदान दिले. सदर पक्षाला पकडून सर्पमित्र संदीप घरत यांना संपर्क करून वनविभागाच्या हवाली केले.
सर्पमित्र संदीप घरत यांनी भारद्वाज पक्षाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक पवार यांच्या देखरेखीत खाली वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा पक्षी फक्त एक ते दीड महिन्याचा असल्याने त्याला उड्डाण करता येत नाही,त्यामुळे जोपर्यंत त्याला उड्डाण करता येत नाही तोपर्यंत त्याची देखभाल करण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र घरत यांनी दिली.
नाव देव कावळा- पण क्रूर पक्षी भारद्वाज अनेक नावांनी ओळखला जातो. सोनकावळा कुकुटकुंभा, कुंभारकावळा, देवकावळा ऋषीच्या नावाने ही ओळखला जातो. तसेच लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा ही सुद्धा भारद्वाजाची वेगवेगळी नावे आहेत. देवकावळा ऋषीच्या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी मांसभक्षक आहे. गोगलगायी, सरडे, छोटे उंदीर,सर्प तो खातो.कावळ्यांच्या तावडीत सापडलेल्या भारद्वाज पक्षाला सोडवून जिवदान दिल्याबद्दल अमृता जंजिरकर व सर्पमित्र संदीप घरत यांचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या