कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर) अलिबाग -मुरुड रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी झालेल्या डांबरीकरणानंतर गतीरोधकांची देखील संख्या वाढली असून ब-याच ठिकाणी या गतीरोधकांना पट्टे, झेब्रा पट्टे नसल्याने अपघाताला आमंत्रण देत असून विशेष करून दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत असून वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागत आहे.मात्र याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष दिसून येते आहे.
मुरुड तालुक्यातील अलिबाग-मुरुड रस्त्यावर विहूर एसटी स्टँड जवळ असलेल्या स्पीडब्रेकरला पट्टे नसल्याने नुकताच दुचाकी स्वराचा अपघात होऊन जखमी झाल्याची घटना घडली आहे्
विहूर गावातील एसटी स्टँडवर असलेल्या स्पीडब्रेकर वरून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे जाणारा दुचाकीस्वार राजेश पडवळ स्पीड ब्रेकर दिसत नसल्याने घसरून आपटला व जखमी झाला. याला कारण मुरुड अलिबाग रस्त्यावर असलेल्या गतीरोधकावर यांना सफेद रंगाचे पट्टे मारलेले नाहीत त्यामुळे हे स्पीड ब्रेकर दिसत नाहीत.त्यामुळे गतीरोधका वरून दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
मुरुड-अलिबाग रस्त्यावर पूर्वी जेवढे गतीरोधक (स्पीड ब्रेकर) होते.त्यात यंदा डांबरीकरणानंतर वाढ झाली असून बऱ्याच ठिकाणी सफेद पट्टे मारलेले नसल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दखल घेऊन या रस्त्यावरील गतीरोधकांना लवकरात लवकर सफेद झेब्रा पट्टे मारावेत व वाहनचालकांचा दूवा घ्यावा.अशी भावना व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या