कोर्लई,ता.८(राजीव नेवासेकर) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 9 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस असून 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली,छोडो भारत ,आंदोलन सुरू झाले. क्रांती दिन हा केवळ इतिहासातील एक दिवस नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागांचे आठवण करून देणारा आणि देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे
या दिवसाच्या औचित्य साधून सर. एस. ए हायस्कूल व कै. म .ल दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय मार्फत विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली व मुरुड मधील क्रांती चौकात मुरुडच्या हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, शाळेचे मुख्याध्यापक सरोज राणे,तोंडले सर, मोरे सर,शिंदे सर व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments