कोर्लई,ता.१(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील रोहिदास नगर वाड्यातील चंद्रकांत नांदगावकर यांच्या घरासमोरील सडलेला गंजलेला वीजेचा खांब धोकादायक अवस्थेत असून याकडे महावितरण चे दुर्लक्ष असल्याबद्दल नाराजीचा सूर दिसून येत आहे.
उसरोली रोहिदास नगर मधील असलेला वीजेचा खांब गेल्या अनेक महिन्यांपासून सडलेल्या गंजलेल्या अवस्थेत आहे. याबाबत महावितरण च्या कार्यालयात वेळोवेळी तक्रार करण्यात आली आहे.
याकडे अधिकारी वर्गाचे अद्यापही दुर्लक्ष असून वेळप्रसंगी याठिकाणी कोणती दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या अधिका-यांनी यात लक्ष पुरवून येथील वीजेचे सडलेले गंजलेले खांब तातडीने बदलण्याची मागणी नागरिकांतून होते आहे.

0 Comments