कोर्लई,ता.२३ (राजीव नेवासेकर)गेले दोन दिवस मुरुड मध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
आज सकाळी ८-०० वा.पर्यंत १५० मि.मी.तर आतापर्यंत १९९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. २१ जून पासून मान्सूनच्या आगमनाने नागरिकांना दिलासा तर शेतकरी राजा सुखावला आहे. पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसेच पुणे, रायगड आणि रत्नागिरी येथील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. यांजकडून इशारा देण्यात आला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंतेत होते. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना चालना मिळणार असून, पाणीसाठ्यांमध्येही काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या